LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

१० वी परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन वेबिनार्स

प्रिय समन्वयक,

प्रादेशिक मीटिंग्समध्ये सांगीतल्या प्रमाणे दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन वेबिनार्स’ ही आणखी एक सुविधा आपल्याला देत आहोत. सोबत बातमीही देत आहोत, नजीकच्या वृत्तापात्रांशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करावी आणि आपल्या नेटवर्कमधील सर्व केंद्रचालकांना या सेवेबाबत माहिती द्यावी आणि या सुविधेचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचावे ही विनंती!

एड्नेक्साआणि MKCL च्या संयुक्त विद्यमाने १० वी परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन वेबिनार्स

इयत्ता १० वीच्या शालांत परीक्षेला आता महिनाच राहिला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास जोरात चालू झाला आहे. मागच्या वर्षीच १० वीच्या Science आणि Maths या विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. विषयांची व्याप्ती वाढली आहे. तसेच परीक्षेचे स्वरूप आणि गुणदान पद्धत (marking scheme) यातही बदल झाला आहे. महत्त्वाच्या धड्यांचा योग्य प्रकारे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येक वेळी या शिक्षकांकडे जाणे शक्य होत नाही. अश्या वेळी technology ची मदत घेतल्यास विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन सहज मिळू शकते. नेमकी हीच गोष्ट ध्यानात घेऊन एड्नेक्सा या Online Education क्षेत्रातल्या संस्थेने MKCL च्या सहकार्याने मोफत revision वेबिनार्सचे आयोजन केले आहे.

वेबिनार म्हणजे ऑनलाईन लेक्चर. विद्यार्थ्यांना घरी राहूनच या लेक्चरचा लाभ घेता येतो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी संगणक व चांगला स्पीड असलेले ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही असे विद्यार्थी MKCL च्या MS-CIT केंद्रांवर जाऊन वेबिनारचा लाभ घेऊ शकतात.

वेबिनारमध्ये अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थी ठराविक वेळी ऑनलाइन येतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा topic हा real-time मध्ये शिकवतात. विद्यार्थी त्यांच्या शंका विचारू शकतात व शिक्षक त्यांना ऑनलाइन उत्तरे देतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. दृक – श्राव्य (audio-visual), digital whiteboard तसेच animations अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जातो. एड्नेक्सा संस्थेनेहे वेबिनार्स इंग्रजी / मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत (विनाशुल्क) आयोजित केले आहेत. तसेच, ज्यांना हे वेबिनार्सना real-time मध्ये हजर राहणे जमत नसेल, त्यांना याचे recording त्यांच्या सोयीनुसार कधीही ऐकता येणार आहे. घरी इंटरनेट कनेक्शन नसल्यास नंतर MKCL च्या कुठल्याही अधिकृत MS-CIT केंद्रावर जाऊन हे recording ऐकता येईल.

या वेबिनार्स मध्ये अनुभवी आणि महत्त्वाच्या पदांवरील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या Science आणि Maths विषयाच्या समन्वयक (co-ordinator) डॉ. सौ. सुलभा विधाते आणि डॉ. सौ. जयश्री अत्रे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिक्षक डॉ. अ. ल. देशमुख, आणि इतर नामवंत शिक्षक यामध्ये समावेश आहे. विविध विषयांच्या धड्यांची तयारी कशी करावी, theory कशी करावी, गणिते कशी सोडवावीत, HOTS प्रश्नांचा अभ्यास कसा करावा अश्या महत्त्वाच्या विषयांवरची माहिती या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. साहजिकच, याचा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे.

वेबिनार्सचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

विषय माध्यम दिनांक-वेळ शिक्षक
Maths – Geometry इंग्रजी / सेमी-इंग्रजी – मंगळवार, ५ फेब्रुवारी, दु. ३ ते ४

– बुधवार, ६ फेब्रुवारी, दु. ३ ते ४

डॉ. सौ. जयश्री अत्रे
इंग्रजी इंग्रजी – गुरुवार, ७ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

– शुक्रवार, ८ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

सौ. शोभा क्षीरसागर
विज्ञान मराठी – शनिवार, ९ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४ सौ. सुवर्णा मनोहर
Science इंग्रजी / सेमी-इंग्रजी – सोमवार, ११ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४ सौ. सुवर्णा मनोहर
इतिहास व नागरिकशास्त्र इंग्रजी – शनिवार, ९ फेब्रुवारी, रात्री ८ ते ९ श्री. संदीप वाटवे
इतिहास व नागरिकशास्त्र मराठी / सेमी-इंग्रजी – सोमवार, ११ फेब्रुवारी, रात्री ८ ते ९ श्री. संदीप वाटवे
भूगोल व अर्थशास्त्र इंग्रजी – मंगळवार, १२ फेब्रुवारी, रात्री ८ ते ९ श्री. संदीप वाटवे
भूगोल व अर्थशास्त्र मराठी / सेमी-इंग्रजी – बुधवार, १३ फेब्रुवारी, रात्री ८ ते ९ श्री. संदीप वाटवे
इंग्रजी मराठी / सेमी-इंग्रजी – सोमवार, ११ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

– मंगळवार, १२ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

सौ. संगीता भिडे
हिंदी (५० मार्क्स) इंग्रजी / मराठी / सेमी-इंग्रजी – सोमवार, १८ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४ डॉ. सौ. यशश्री कर्वे
हिंदी (१०० मार्क्स) इंग्रजी / मराठी / सेमी-इंग्रजी – मंगळवार, १९ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४ डॉ. सौ. यशश्री कर्वे
गणित – भूमिती मराठी – गुरुवार, १४ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

– शुक्रवार, १५ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

डॉ. सौ. जयश्री अत्रे

वेबिनार्ससाठी www.ednexa.com/sscwebinar या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा अधिक माहितीसाठी कृपया पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा : 9011041155 / 9326552525/90326552525

संकेतस्थळ आपल्या महितासाठी

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

D.S.A.N. Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd

Near Dipali Hotel, 1st Floor, Pl.No. 9,

Maya Nagar, N-2, CIDCO, Aurangabad – 431003 ;

Å 0240 – 2470333, 2470289, È8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

Think before you print!!!

SSC Webinars – Ednexa-MKCL Press note.docx

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: