LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

अतिशय उत्तम कार्यक्रम

प्रिय समन्वयक,

लातूर जिल्ह्यातील एका केंद्राने केलेल्या उपक्रमाबद्दल आपल्याला सांगावेसे वाटते आपणही असा उपक्रम घेऊ शकता तसे तालुका पातळीवर एकत्र छापुन करता येऊ शकतो .

“श्री. अलीम शेख यांनी काल काही शाळांना भेट देऊन इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी एम के सी एल ने दिलेली प्रश्न आणि उत्तर पत्रिकांचा संच मुख्याध्यापकांना दिल्याचे फोटो आपणा सर्वांना आजच सकाळी पाठविले आहेत. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आज श्री. अलीम शेख यांच्या केंद्रात जाऊन प्रश्न आणि उत्तर पत्रिकांचा संच घेण्यासाठी सांगितले. त्यानुसार जवळपास १९० विद्यार्थ्यांनी श्री. अलीम शेख यांच्या केंद्रात येऊन हे संच घेतले. प्रत्येक विषयाच्या प्रश्न आणि उत्तर पत्रिकांचा संच वेगवेगळा केलेला आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून त्यांच्याच मित्रांचा / मैत्रिणींचा ५ जणांचा ग्रुप करण्यास सांगितले आणि एका ग्रुपला प्रत्येक विषयाच्या प्रश्न आणि उत्तर पत्रिकांचा संच एकत्रित संच देण्यात आला. यातून त्यांचा खर्च कमी होऊन विद्यार्थ्यांना परस्परांमध्ये हे विविध विषयांचे संच आळीपाळीने वापरता येतील.

केंद्रावर संच नेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी च्या आताच्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने एस एस सी प्रक्टिस टेस्ट मधील एक टेस्ट सोडवून घेण्यात आली. आणि १५० विद्यार्थ्यांचे एस एस सी प्रक्टिस टेस्ट साठी नांव नोंदवून घेण्यात आले. उद्या रविवारी १५० विद्यार्थी एस एस सी प्रक्टिस टेस्ट सोडविण्यासाठी त्यांच्या केंद्रावर येत आहेत.“

एम के सी एल ने दिलेल्या उपक्रमाचा उपयोग शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि केंद्रांच्या मार्केटिंग साठी करून घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच आपलाही व्यवसाय वाढावा हीच अपेक्षा….

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: