LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MKCLतर्फे अभिनंदन, शुभेच्छा आणि खास भेटी

प्रिय MS-CIT केंद्र समन्वयक,

सप्रेम नमस्कार.

MS-CIT मार्च २०१३ बॅचच्या प्रवेशासाठी तुम्ही सर्वांनी जे अपार कष्ट घेतलेत त्या बद्दल तुमचे किती कौतुक करू?

तुमच्या परिश्रमाबद्दल कृतज्ञता, भरघोस यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि एप्रिल व मे २०१३ बॅचेस् मधील त्याहीपेक्षा भरघोस यशासाठी खूप खूप शुभेच्छा.

या आनंदाच्या क्षणी MKCL तर्फे तुमच्या केंद्राला खाली नमूद केलेल्या खास भेटी पाठवण्यात मला विशेष आनंद होत आहे.

वस्तुरूप भेटी:

१. सर्व केंद्राना या वर्षासाठी Windows7 आणि MS-Office 2010लायसंसेस् (त्यांच्या वितरणाविषयी सविस्तर सूचना लवकरच पाठवण्यात येतील.)

२. सर्व केंद्राना प्रत्येकी एक SOLAR शी संलग्न असा अत्याधुनिक Biometric Fingerprint Reader (त्याच्या हस्तांतरणाविषयी व वापराविषयी सविस्तर सूचना लवकरच पाठवण्यात येतील.)

३. सर्व केंद्राना त्यांच्या केंद्रातील मार्च २०१३ बॅचपर्यंत WORM मध्ये नोंदवलेल्या सर्वाधिक (server व client) संगणक-संख्येसाठी प्रत्येक संगणकामागे एक असे ERA शी संलग्न अत्याधुनिक वेब कॅमेरे (त्यांच्या हस्तांतरणाविषयी व वापराविषयी सविस्तर सूचना लवकरच पाठवण्यात येतील.)

व्यवसायाच्या नवीन सुवर्णसंधी:

४. वरील सर्व भेटी आपल्या केंद्रात मे अखेरपर्यंत व्यवस्थित कार्यान्वित होतील व आपल्या सर्व केंद्रांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा high-tech look प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर त्यांचा MS-CIT प्रशिक्षण, अंतर्गत मूल्यमापन व अंतिम परीक्षांसाठी नियमित वापर सुरु करून त्यावर सर्व केंद्राना पुरेसा आत्मविश्वास प्राप्त होताच विविध क्षेत्रातील online examination business आपल्या सर्व केंद्रांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण या अत्याधुनिक सज्जतेनंतर कोणत्याही एका दिवशी (विशेषतः रविवारी) १ तासाच्या ५ सत्रांमध्ये राज्यभरातील सुमारे १,५०,००० उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची व त्यांना तत्काळ ई-प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रचंड क्षमता आपल्या नेटवर्ककडे असेल!

समाधानकारक कामाबद्दल उत्तेजनार्थ रोख पारितोषिके:

५. तसेच या वर्षी “ZERODROPOUT मोहिमेला” उत्तेजन देण्याच्या उद्देशाने जानेवारी ते नोव्हेंबर २०१३ बॅचेस मधील प्रत्येक केंद्रातील प्रवेशसंख्या व प्रशिक्षणाची गुणवत्ता विचारात घेवून खालील रोख पारितोषिकेदेण्यात येतील व ती रक्कम येत्या तीन दिवसात (१० एप्रिल २०१३ पर्यंत) आपल्या केंद्राच्या SOLAR Login मधील विशेष अॅडव्हांस अकौंट मध्ये जमा करण्यात येईल. मात्र सदर रक्कम एप्रिल २०१३ प्रवेशासाठीच वापरावी लागेल. ती अकौंटमधून काढून घेता येणार नाही.

· सदर पारितोषिके प्राप्त करण्यासाठी वर्ष २०१२ मध्ये कार्यरत असलेल्या केंद्रांपैकी ज्या केंद्रांचे वर्ष २०१३ साठी नूतनीकरण झाले आहे अशीच केंद्रे पात्र समजण्यात येतील.

· अशा पात्र केंद्राना वर्ष २०१२ मधील त्यांच्या एकूण confirmed learners पैकी ज्यांना अंतर्गत मूल्यमापनात ५० पैकी ३० (६०%) किंवा ३० पेक्षा (६०% पेक्षा) अधिक गुण मिळाले आहेत अशा प्रत्येक learner मागे रुपये ३२ पारितोषिक रुपाने दिले जातील.

· दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की ज्या केंद्रात गेल्यावर्षी अंतर्गत मूल्यमापनात ३० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे १२५ विद्यार्थी होते त्या केंद्राना त्यांच्या या वर्षीच्या common marketing fund पैकी रुपये ४००० त्या केंद्राच्या व्यावसायिक व शैक्षणिक कामगिरीच्या सन्मानार्थ MKCL तर्फे पारितोषिक रुपाने परत देण्यात येतील.

तुमच्या केंद्रातील MS-CIT एप्रिल-मे २०१३ बॅचेसच्या प्रवेशातील भरघोस यशासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देवून हे विशेष भेट-पत्र संपवितो.

आपला स्नेहांकित,

विवेक सावंत

व्यवस्थापकीय संचालक

महारष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित

हे पत्र सर्व ALCs ना त्वरित ई-मेलने पुढे पाठवण्याची संबंधित LLCsना नम्र विनंती.

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: