LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

आजची ज्ञानेश्वरी: आषाढी एकादशीनिमि त्त विनंती पत्र

शुक्रवार, १९ जुलै २०१३

आषाढ शुद्ध एकादशी

प्रिय MS-CIT केंद्र समन्वयक,

सप्रेम नमस्कार.

आषाढी एकादशीनिमित्त तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.

तुम्हा सर्वांना माहीतच आहे की MKCL तर्फे तुमच्या केंद्रासाठी ‘आजची ज्ञानेश्वरी’ ही ग्रंथभेट पाठवली आहे.

आत्तापर्यंत ती तुम्हाला मिळाली असेलच.

आज आषाढीच्या निमित्ताने या विशेष भेटीविषयी काही सांगावे, म्हणून हे पत्र.

‘आजची ज्ञानेश्वरी’ या ग्रंथामध्ये मूळ ज्ञानेश्वरीच्या ओवीतील प्रत्येक शब्दाच्या बरोबर खाली आजच्या मराठीतला प्रतिशब्द योजला आहे. आजच्या मराठी वाचकांना ज्ञानेश्वरीचा अर्थ सहज समजून घेता यावा हा यामागील हेतू आहे. असे करताना, मूळ ओवीच्या अर्थाला कुठेही बाधा पोचणार नाही याची काळजी घेतली आहे, तसंच त्यातील ओवीबद्धताही कायम ठेवली आहे. मूळ ज्ञानेश्वरी वाचताना तज्ञ आणि अनुभवी वाचकाला जी अनुभूती येईल तीच नव्या वाचकालाही यावी हा यामागील उद्देश आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या मराठीत जर ज्ञानेश्वरी लिहिली असती तर जे शब्द कदाचित निवडले असते ते किंवा तसे शब्द योजण्याचा लेखकाचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे.

या ग्रंथातील प्रत्येक पानाच्या शिरोभागी डावीकडे प्रत्येकी २ पाटपोट पानांसाठी एक असा दिवस-क्रमांक दिला आहे. यावरून आपणांस हे लक्षात येईल की रोज सकाळी साधारणपणे १० मिनिटे वाचन केल्यास एकूण ३६५ दिवसात हा ग्रंथ वाचून पूर्ण होऊ शकतो!

ज्ञानयुगातील वाटचालीत ज्ञान महामंडळाच्या आपल्या कुटुंबातील सर्वांनीच ‘आजच्या ज्ञानेश्वरी’ चे वाचन, मनन आणि चिंतन आजपासून रोज करावे असे सुचवावेसे वाटते.

आपल्या सर्वांच्याच ज्ञानसाधनेच्या प्रवासात ही ग्रंथभेट आपल्याला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

आपला स्नेहांकित,

विवेक सावंत

व्यवस्थापकीय संचालक

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित

Single Post Navigation

यावर आपले मत नोंदवा