LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

सस्नेह निमंत्रण

प्रिय केंद्र समन्वयक,

सस्नेह निमंत्रण

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म. (एमकेसीएल), औरंगाबाद विभाग शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकरिता नेहमीच विविध उपयुक्त उपक्रम राबवीत असते.

समाजामधील विविध क्षेत्रात आपल्या सेवा देणाऱ्या शिक्षकांविषयी सर्वांच्याच मनात नेहमीच खूप आदराचे स्थान असते. शिक्षक आपले संपूर्ण आयुष्य आपल्या विद्यार्थ्यांना पर्यायाने समाजाला घडविण्याकरिता खर्ची घालतात. विविध क्षेत्रातील शिक्षकांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म. (एमकेसीएल), औरंगाबाद विभाग मार्फत “ज्ञानदीप पुरस्कार-२०१३ (एमकेसीएल, उत्कृष्ट औरंगाबाद विभाग, शिक्षक पुरस्कार)” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालये यामधून एकूण ७५ शिक्षकांची निवड या पुरस्काराकरिता करण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांची पुरस्काराकरिता शिफारस त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालया मार्फत करण्यात आलेली आहे. या सर्व शिक्षकांनी त्यांच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना व समाजाला उपयोगी असे मोलाचे कार्य केलेले आहे.

आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, आपण या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आग्रहाची विनंती.

कार्यक्रमाचा दिवस : रविवार : ०८, सप्टेंबर २०१३

कार्यक्रमाची वेळ : सकाळी : 09.30 ते दुपारी : 02.30

कार्यक्रमाचे ठिकाण : महसूल प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्र,

शासकीय दूध डेअरी शेजारी,

अमरप्रीत सिग्नल जवळ, औरंगाबाद.

आपल्या स्वागताच्या प्रतिक्षेत.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

Single Post Navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: