LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MS-CIT Center Renewal Process for the year 2014.

प्रिय समन्वयक,

नमस्कार,

आपल्या सर्वांना प्रतीक्षा असलेली लिंक अर्थात केंद्र नूतनीकरणाची लिंक आलेली आहे

आपल्या आवडत्या तसेच रोज आपण आवर्जून तपासत असलेल्या सोलार पोर्टल मधील Channel Partner Network या मेनू मधील View, Apply, Process Activity/Project/Course या सब मेनू मध्ये Submit EOI for Course/Project/Activity या लिंक वर क्लिक करून त्या मध्ये center renewal 2014 या लिंक वर क्लिक करा आपल्या TP ची निवड करा म्हणजे आपली केंद्र नूतनिकरणची प्रक्रिया सुरू होईल लक्षात घ्या आपल्या कडे दि. 28 ऑक्टोबर पर्यंतच वेळ आहे त्या नंतर लिंक बंद होईल.

सोबत सविस्तर वेळापत्रक आणि कार्य पद्धती दर्शविली आहेच आणि आम्ही आपल्याला वेळोवेळी महिती पुरविण्याचे काम करूच यात शंका नसावी.

आपल्याशी काही गोष्टी केंद्र नूतनीकरन करते वेळी विशेष बोलाव्याश्या वाटत आहेत त्या खालीलप्रमाणे :

आपण केंद्र नूतनीकरण या शब्दाचा मूळ मराठी अर्थ विसरून जातो आणि फक्त एमकेसीएल ने कळविलेली प्रक्रिया पार पडून आपले कार्य संपले असे मानतो, पण प्रत्यक्षात असे नाही.

मित्रांनो नूतनीकरण म्हणजे आपले केंद्र नव्याने व्यवसायासाठी सज्ज करणे असे मला वाटते. आता तर पर्यायाने दिवाळी सुद्धा आलेली आहे आणि आपल्याला आपले केंद्र नव्याने सज्ज करायला एक आणखीन छान कारण मिळाले तेव्हा मित्रांनो आपण सर्वांनी यंदा नूतनीकरण / दिवाळी मध्ये काही गोष्टी अमलात आणण्याचा प्रयत्न करूया का ? …

· आपल्या केंद्राच्या नावाचा मुख्य फलक एमकेसीएल ने ठरवून दिलेल्या ब्रॅंड मार्गदर्शक तत्वांनुसार आहेना याची खात्री करा (नसल्यास नवीन तयार करून घ्या) त्यावर छानशी लाईटिंग लावा जेणे करून लोकांचे लक्ष केन्द्रित होईल.

· आपल्या केंद्रातील अडगळ/अडचण/नको असलेले पण आपल्या प्रेमापोटी आठवण म्हणून ठेवलेले काही साहित्य (उदा. 486 पीसी, जुने मॉनिटर, सीडी रॉम, हार्ड डिस्क,इत्यादि जे आपण शोकेस मध्ये सुद्धा राखून ठेवलय) ते कृपया काढून टाका.

· आपल्या केंद्रातील अंतर्गत मांडणी बदलून त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा.

· शक्य असल्यास भितींचा रंग उडालेला असेल तर त्या जागेवर छानसे बॅनर लावून तो भाग व्यवस्थित करा.

· जुने जाहिरात साहित्य (ब्रॅंड मार्गदर्शक तत्वांनुसार नसलेले/ किंवा खराब झालेले/ रंग उडलेले) नाहीसे करून नवीन लावा.

· केंद्रामध्ये छान पोस्टर, पताके ई. लावून सजावट करा.

· केंद्राच्या प्रवेश दारा समोर छान स्वागत फलक तसेच आपल्या केंद्राचा कोड, टीएलसी, डब्ल्यूएलसी, एलएलसी, आरएलसी चा संपर्क क्रमांक, ठळक अक्षरात बॅनर करून लावा.

· आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचा दिवाळी मेळावा आयोजित करा (ज्यात आपल्याला नवीन कोर्सेस ची माहिती देता येण्यासाठी कारण मिळेल उदा. क्लिक)

· शक्य झाल्यास त्यांना काही भेटवस्तू/ग्रीटिंग द्या.

· लोकांना ई- फटाके सॉफ्टवेअर टाकून द्या. आणि त्यासाठी प्रवृत्त करा. (सोबत जोडलेले आहे)

· सोबत एक पीपीटी देत आहे त्यातून कुणाच्याही चुका दाखविन्याचा हेतु नाही कृपया तसा काही घडल्यास आम्ही आधीच दिलगिरी व्यक्त करतो.

हे काही मला सुचलेले मुद्दे होते आपल्याला काही आणखी सुचल्यास आपण आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका. नक्कीच फायदा होईल.

काहीही अडचण असल्यास आम्ही आपल्या साठी सदैव तत्पर आहोत.

चला मग लागू कामाला आणि करू सुरुवात एका नवीन पर्वाला….

आपल्या सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा

(अशक्य अशी कोणतीही गोष्ट नसते फक्त तो पर्यन्त जो पर्यन्त तुम्ही ती हातात घेत नाहीत. नसता…. )

सदिच्छांसह,

निलेश झाल्टे,

देव सिद्ध अस्सीम निर्मिती प्रा.लि.

लोकल लीड सेंटर, औरंगाबाद.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

MS-CIT Center Renewal Process- 2014- 1.3.xlsx

Guidelines for MS-CIT ALC renewal 1.3.pdf

revalidation.docx

Think it wel.ppsx

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: