LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

MS-CIT कोर्सची १ कोटी विद्यार्थी संख ्येकडे वाटचाल!

MS-CITकोर्सची १ कोटी विद्यार्थी संख्येकडे वाटचाल!

सातत्याने बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संगणक-साक्षरतेबरोबरच कंप्यूटरचे स्मार्ट उपयोग शिकण्याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आधुनिक युगात मोबाईलबरोबरच कंप्यूटरलाही पर्याय नसल्याने दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पाच लाख तर संपूर्ण वर्षात सुमारे नऊ लाख विद्यार्थीएम.एस.सी.आय.टी. (MS-CIT) या आंतरराष्ट्रीय दर्जाचा अद्ययावत संगणक प्रशिक्षणास प्रवेश घेतात. नववी ते बारावीची परीक्षा दिलेल्या बहुतांशी विद्यार्थ्यांमध्ये गेमिंग, चॅटींग, कॉम्पुटींगची आवड आणि उच्च शिक्षणाचे ध्येय असल्याने संगणक साक्षरता अत्यावश्यक ठरते. एकंदरीत आजच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अध्ययन करण्यासाठी ई-लार्निंग वापर होत असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांकडून एमकेसीएलच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राकडे धाव घेतली जाते. इतक्या मोठया विद्यार्थी संख्येला शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कंप्यूटरचा स्मार्ट वापर करावयास शिकता यावे याकरिता एमकेसीएलतर्फे यावर्षी ५५४२ अधिकृत अध्ययन केंद्रे कार्यान्वयित करण्यात आली आहेत. यात विद्यार्थ्यांचा प्रवासखर्च वाचावा म्हणून नव्याने सुरू केलेली दुर्गम व ग्रामीण भागातील सॅटेलाईट केंद्रांचाही समावेश आहे. या अध्ययन केंद्रांच्या राज्यव्यापी महानेटवर्कमध्ये अद्ययावत हार्डवेअर व सॉफ्टवेअर्सने सुसज्ज असलेले ६५००० इंटरनेट-रेडी संगणक आहेत. २०१३ मध्ये महाराष्ट्रात एमकेसीएल मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण केंद्रांची संख्या ४६०० होती.

या केंद्रांवर आधुनिक संगणक, इ-लर्निंगसाठी ‘ईरा’ ही नवीन शिक्षण प्रणाली, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम, २५०००हून अधिक प्रशिक्षित मार्गदर्शक, सर्व प्रकारची अधिकृत सॅफ्टवेअर्स, इंटरनेटची आणि लाईट बॅक-अपची सोय इ. सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तेचे शिक्षण तसेच शैक्षिणिक वातावरण मिळते. ‘एम.एस.सी.आय.टी.’ मध्ये इंग्रजी, मराठी व हिंदी अशा तीनही भाषांतून हे प्रशिक्षण दिले जाते. ‘कामातून ज्ञान आणि त्या ज्ञानातून फलदायी काम’ या तत्त्वावर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थी करिअरकरीता तयार होतात आणि आत्मविश्वासाने कंप्यूटरचा वापर करून विविध आउटपुटस् निर्माण करू शकतात. उदा: पत्र, प्रेझेंटेशनस्, प्रोजेक्ट्स, पोस्टर्स ई. त्याचबरोबर बहुउपयोगी इंटरनेटवरील १५० हून अधिक स्किल्समध्ये मास्टर झाल्यामुळे दैनंदिन व्यवहारउपयोगी ऑनलाईन गोष्टी घरबसल्या करता येतात उदा: तिकीट बुकिंग, लाईटबिल भरणा, फोन रिचार्ज इ. एम.एस.सी.आयटी. अभ्यासक्रमाच्या या व अशा अनेक वैशिष्टयांमुळे लाखो विद्यार्थी सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. गेल्या बारा वर्षांत ९० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘एम.एस.सी.आय.टी.’ या माफक शुल्कातील परिपूर्ण कंप्यूटर कोर्समार्फत दर्जेदार प्रशिक्षण घेतले आहे. आणि महाराष्ट्राला देशातील पहील्या क्रमांकाचे संगणक साक्षर राज्य बनविण्यात मोलाच सहकार्य केले आहे. या वर्षी महाराष्ट्रामध्ये एम.एस.सी.आयटी १ कोटीहून अधिक संगणक साक्षरतेचा टप्पा पार अशी आमची खात्री आहे.

एमकेसीएलने ऊभारलेल्या राज्यव्यापी नेटवर्कमध्ये शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील २५ हजार युवकांना त्यांच्याच गावात माहिती तंत्रज्ञानावर आधारित हाय-टेक रोजगार व स्वयंरोजगार उभे करता आले आहेत. त्यामुळे १ लाख युवकांना अप्रत्यक्षरित्या एम.के.सी.एल नेटवर्कमध्ये त्यांच्या गावात रोजगार/व्यवसायाव्दारे उपजिविकेच्या संधी मिळाली आहे.

Thanks and Regards,

Nilesh D. Zalte

D.S.A.N. Pvt. Ltd.

Maharashtra Knowledge Corporation Ltd

Near Dipali Hotel, 1st Floor, Pl.No. 9,

Maya Nagar, N-2, CIDCO, Aurangabad – 431003 ;

Å 0240 – 2470333, 2470289, È8275319797

Website: llcaurangabad.wordpress.com

Think before you print!!!

Advertisements

Single Post Navigation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: