LLC Aurangabad

सर्वांना सहकार्य करण्यासाठी

हात मदतीचा – निखिल साठी

nikhilप्रिय मित्रांनो,

आपल्या MKCL कुटुंबातील सदस्य श्री. दत्तात्रय सुधाकरराव धामणगावकर, वक्रतुंड कॉम्पुटर्स जालना यांच्यावर अतिशय दु:खद प्रसंग ओढवला आहे, श्री. धामणगावकर यांचा मुलगा चि.निखील दत्तात्रय धामणगावकर वय वर्षे ९ हा गेल्या ३ वर्षापासून “अप्लास्टिक अनेमिया” या आजाराने ग्रस्त असून या आजारावर बोन- मॅरो ट्रान्स्फर सर्जरी हाच एकमेव व अत्यंत खर्चिक उपचार आहे या पूर्वी २०१२ साली त्याची बोन- मॅरो ट्रान्स्फर सर्जरी झालेली असून त्यावेळी त्यांला त्याचा लहान भाऊ चि. देवांश दत्तात्रय धामणगावकर वय वर्षे ४ ह्याचा बोन मॅरो दिला गेला होता. त्यावेळी ह्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास १५ लक्ष रुपये खर्च आला होता. व त्यासाठी त्यांच्या कडील सर्व रक्कम वापरल्या गेली आहे. त्यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व केंद्रांनी आपापल्या परीने जमेल तेवढी रक्कम देऊन खूपच मोलाची मदत केली होती आणि धामणगावकर कुटुंबाला या दुखातून सावरण्याचा प्रयत्न केला होता.

आता दुर्दैवाने चि. निखील ह्यास पुन्हा एकदा तोच आजार उद्भवला असून परत एकदा तीच शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे. धामणगावकर यांची सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण असून निखीलच्या इलाजासाठीची रक्कम कुठून जमा करावी हा अत्यंत मोठा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांसमोर आहे कारण मागील उपचारात घरातील सर्व रक्कम खर्च झालेली आहे.

अशा परिस्थितीत धामणगावकर कुटुंबाला इलाजासाठी मोठ्या रकमेची आणि अर्थातच आपल्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे.

माझी विनंती आहे की आपणास जमेल तितकी रक्कम खालील बँक खात्यावर जमा करावी व आपल्या कुटुंबातील सदस्य श्री. दत्तात्रय धामणगावकर ह्यांना मदत करावी.

ह्या मदती साठी आम्ही इतर ही बऱ्याच ठिकाणी मदत मागत असून तिथून ही आर्थिक मदत मिळण्याच्या अपेक्षेत आहोत.

खालील लिंक वर जाऊन आपली माहिती द्यावी.

माहिती लिंक

(http://goo.gl/forms/bIjfIADPks)

खातेदाराचे नाव . : दत्तात्रय सुधाकरराव धामणगावकर

बँक खाते क्र. : ३२१६१२०३१४७

बँकेचे नाव : भारतीय स्टेट बँक

शाखा : मुख्य शाखा जालना                    IFSC Code: SBIN0007150

या प्रसंगी आपली छोटीसी मदत देखील खूप मोलाची ठरू शकते आणि धामणगावकर कुटुंबाला या दुखद प्रसंगाशी सामना करण्याचे बळ देऊ शकते

आपण नक्की मदत कराल या अपेक्षेसह.

सर्व कागदपत्रे : लिंक

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s